स्वातंत्र्यसंग्रामांतील वेंगुर्लेवासीयांची कामगिरी
भारतात आणि मुख्यतः पुण्या-मुंबईकडे कोणतीही चळवळ सुरू झाली की तिचे पडसाद वेंगुर्ल्यात सर्वप्रथम पडावयाचे हे जवळ जवळ ठरल्यासारखेच झाले होते. 1857 च्या क्रांतियुद्धाच्या वेळी तात्या टोपेच्या सैन्यांत इथल्या पंडित घराण्यापैकी नाना पंडित यांनी बजावलेली कामगिरी वेेंगुर्लेवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू…
