‘फरा‘ प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी कै. फटीराव रामचंद्र देसाई अर्थात ‘फरा‘ प्रतिष्ठानचा दशावतारी गुरूपौर्णिमा उत्सव वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार दिलीप देसाई, प्रसिद्ध चित्रकार आनंद ठोंबरे, फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते. …
