सरस्वती शिशूवाटिकेचा स्नेहसंमेलन उत्साहात
वेंगुर्ला येथील सरस्वती शिशूवाटिकेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण समारंभ 5 एप्रिल रोजी येथील नगरवाचनालय संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी व्यासपिठावर नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, निवृत्त प्राध्यापक महेश बोवलेकर, पत्रकार प्रथमेश गुरव, पालक प्रतिनिधी स्वाती गावडे, संदिप डेकोरेटर्सचे रामदास हळदणकर उपस्थित होते. …
