‘एक तारीख, एक तास स्वच्छता मोहिमे‘ला अभूतपूर्व प्रतिसाद
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमत्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने रविवारी आयोजित केलेल्या ‘एक तारीख, एक तास स्वच्छता मोहिमे‘ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मोहिमेंतर्गत शहरातील मार्केट, हॉस्पिटल नाका, कॅम्प, बंदर रोड, बसस्थानक, वेशी भटवाडी, खांबड भटवाडी, आनंदवाडी, रामघाट रोड, दाभोली नाका आदी ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत नगरपरिषद कर्मचारी, भाजी विक्रेते, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, स्वामिनी बचत गटाच्या…
