खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग

वेंगुर्ला खरेदी विक्री संघ इमारतीच्या खाली असलेल्या खत दुकानाला 19 डिसेंबर रोजी पहाटे 4.30वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक होऊन हजारोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान ज्येष्ठ भजनी बुवा विजय गुरव पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे…

0 Comments

तुलसी विवाहाला प्रारंभ

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात शुक्रवारपासून तुलसी विवाहाला प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी रात्रौ उशिरापर्यंत घरोघरी तुलसी विवाह  समारंभ सुरू होते.  कार्तिक शुद्ध द्वादशीला घरासमोरील असणा-या तुलसी वृंदावनाचा विवाह करण्याची प्रथा आहे. त्यानुसार शुक्रवारपासून विवाह समारंभ सुरू झाले आहेत. दुपारपासूनच ठिकठिकाणी मंगलाष्टका ऐकू येत होत्या.…

0 Comments

सागर सुरक्षा कवच मोहिमेनिमित्त वाहनांची तपासणी

सागर किनारपट्टीच्या सुरक्षेच्यादृष्टीने १६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ल्यात सागर सुरक्षा कवच मोहिम राबविण्यात आली. रेडी किनारपट्टी ते हरिचरणगिरी किनारपट्टीपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. तसेच मानसीश्वर मंदिरसमोर मुख्य मार्गावर, रेडी चेक पोस्ट आदी ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल…

0 Comments

‘पालावरची दिवाळी‘ अंतर्गत फराळाचे वाटप 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार समाजातील वंचितांना भारतीय हिदू संस्कृती, सण समारंभात सहभागी करून त्यांचे जीवन अधिकाधिक प्रकाशमय करण्यासाठी ‘पालावरची दिवाळी‘ साजरी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या कातकरी समाजासोबत ‘पालावरची दिवाळी‘ साजरी करण्यात आली.…

0 Comments

व्यापा-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार-सचिन वालावलकर

वेंगुर्ला बाजारपेठ मित्रमंडळाच्या दीपावली शो टाईमचे उद्घाटन वेंगुर्ला शहरात विकासात्मक काम करत असताना वेळोवेळी येथील व्यापा-यांच्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून झाले आहे. या बाजारपेठेतील व्यापारी खरोखरच प्रामाणिकपणे व्यापार करीत आहेत. यापुढेही इतर प्रश्न सोडविण्यासाठी व्यापा-यांच्या पाठीशी ठामपणे…

0 Comments

दीपोत्सवातून आगळावेगळा सलाम

संपूर्ण जगात भारताचे नाव चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेने गौरविण्यात आले. या गौरवशाली परंपरेस व शास्त्रज्ञानाच्या संशोधनाला सलाम करण्यासाठी वेंगुर्ला मारूती स्टॉप येथील पुरातन मारूती मंदिरात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ११११ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करीत भारताच्या गौरवशाली परंपरेस आगळावेगळा सलाम करण्यात आला. हनुमान मंदिर सेवा…

0 Comments

तीन ग्रा.पं.वर भाजपाचा तर एका ग्रा.पं.वर उबाठाचा सरपंच

 वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी, खानोली, मातोंड व पेंडूर या चार ग्रा.पं.च्या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी ७७.१९ टक्के एवढे मतदान झाले. चारही ग्रामपंचायतीत मिळून एकूण ६१५२ मतदारांपैकी ४७४९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मातोंड-सुकाळेवाडी येथील ग्रामस्थांना एका राजकीय पक्षाने निवडणुकीपूर्वी त्या वाडीत जाणारा रस्ता…

0 Comments

लक्ष्मी पूजनादिवशी उभादांडा येथे गणपतीची प्रतिष्ठापना

उभादांडा येथील गणपती मंदिराला आगळी वेगळी परंपरा लाभली आहे. या मंदिरात आश्विन कृष्ण अमावस्येला म्हणजेच दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनादिवशी भल्या मोठ्या गणपतीचे पूजन केले जाते. यावर्षीही ही परंपरा तेवढ्याच उत्साहात जपण्यात आली. लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी ७ वाजता गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर ख­या अर्थाने…

0 Comments

किरातने सातत्याने जपली साहित्य परंपरा – अॅड.देवदत्त परूळेकर

साप्ताहिक किरातच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नगर वाचनालयाच्या सभागृहात संत साहित्याचे अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर, नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार, चित्रकार सुनील नांदोस्कर, किरात व्यवस्थापक सुनिल मराठे, प्रा.महेश बोवलेकर, डॉ.श्रीराम हिर्लेकर, किरातचे ज्येष्ठ वाचक गुरूनाथ रॉय, विजया रॉय, किरातचे विश्वस्त प्रशांत आपटे, अॅड.शशांक…

0 Comments

कॅम्प कॉर्नर मंडळास रूग्णवाहिका

वेंगुर्ला शहरातील नागरिकांची रूग्णवाहिकेअभावी होणारी परवड लक्षात घेता कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा सेनेचे शहरप्रमुख उमेश येरम यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे रूग्णवाहिकेची मागणी केली होती. त्यानुसार केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या सी.एस.आर.मधून ही अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शिवसेनेचे…

0 Comments