
वेंगुर्ला तालुका वकील संघटनेची वार्षिक सभा ८ मे रोजी पार पडली. या सभेत मे २०२६ ते एप्रिल २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्ष-अॅड.श्रीकृष्ण ओगले, उपाध्यक्ष-अॅड.प्रकाश बोवलेकर, सचिव-अॅड.सागर ठाकूर, खजिनदार-अॅड.पूनम नाईक, सहसचिव-अॅड.श्रद्धा बावीस्कर तर सदस्य म्हणून अॅड.मनीष सातार्डेकर व अॅड.आरती गावडे यांचा समावेश आहे. यावेळी अॅड.एन.जे.गोडकर, अॅड.जी.जी.टांककर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, अॅड.अक्षता राऊळ, अॅड.तेजश्री कांबळी, अॅड.सुनिल मालवणकर, अॅड.धनंजय झांटये, अॅड.वैदेही नरसुले, अॅड.नामदेव मठकर, अॅड.शुभदा सातोस्कर, अॅड.हर्षदा कुडव, अॅड. शुभांगी सडवेलकर व अॅड.भावना पोखरे आदी उपस्थित होते.
