महिलांच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत धुळे येथील आरती जोशी प्रथम

 

ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा ही आजही लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानली जाते. या सेवेत कार्यरत महिला कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही जबाबदारीने सेवा बजावत असतात. अशा महिला कर्मचाऱ्यांच्या अनुभवांना, भावविश्वाला आणि सामाजिक जाणिवांना अभिव्यक्ती देण्यासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत धुळे येथील आरती जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा वेताळ प्रतिष्ठान आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित केली होती. यात राज्यातून २७ जणांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी “एस.टी. म्हणजे ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी” हा विषय ठेवला होता. स्पर्धेत द्वितीय-श्रद्धा रेडकर, तृतीय-आरती केरकर, उत्ते.-सेजल रजपूत आणि प्रांजल जाधव यांनी मिळविला. निबंधांचे परीक्षण डॉ.सचिन परूळकर यांनी केले. स्पर्धकांनी आपल्या निबंधांतून एस.टी. सेवेचे महत्त्व, महिला कर्मचाऱ्यांचे योगदान, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी तसेच प्रवाशांशी जुळलेले भावनिक नाते अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले. आयोजकांच्यावतीने विजेत्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply