►डॉ.गिरीश चौगुले नूतन वैद्यकीय अधीक्षक

सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ.गिरीश चौगुले यांनी नुकताच वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी पं.स.सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जि.प.सदस्य संजय गावडे, नागरी कृती समितीचे अॅड.नंदन वेंगुर्लेकर, जयराम वायंगणकर, साहस प्रतिष्ठानच्या रूपाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजित राऊळ, जया तुळसकर आदींनी रूग्णालयाला भेट देत नूतन वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश चौगुले यांचे स्वागत केले. उपजिल्हा रूग्णालयाच्या दर्जानुसार वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात कोणत्याही सुविधा नाहीत. अद्ययावत इमारत आहे. चांगल्या दर्जाच्या खाटा, सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आहे. मात्र या रूग्णालयात डॉक्टर, तंत्रज्ञांची कमी आहे. पुरेसा नोकरवर्गही नाही. अनेक जागा रिक्त असल्याने रूग्णालयाच्या दैनंदिनीवर त्याचा परिणाम होत आहे. या रूग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी आवश्यक गोष्टींची तात्काळ पूर्तता करा, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.

Leave a Reply