वेंगुर्ला न.प.मार्फत पर्यावरण रक्षणासाठी आणि शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्लास्टिक बंदी अंतर्गत नुकतीच कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. यात मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या विविध भागांत कडक तपासणी करून सुमारे 20 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व साहित्य जप्त करण्यात आले. एकूण दहा जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 5 हजार रूपये एवढा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत स्वत: मुख्याधिकारी सहभागी झाले होते.►वेंगुर्ल्यात 20 किलो प्लास्टिक जप्त
वेंगुर्ला न.प.मार्फत पर्यावरण रक्षणासाठी आणि शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्लास्टिक बंदी अंतर्गत नुकतीच कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. यात मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या विविध भागांत कडक तपासणी करून सुमारे 20 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व साहित्य जप्त करण्यात आले. एकूण दहा जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 5 हजार रूपये एवढा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत स्वत: मुख्याधिकारी सहभागी झाले होते.