►शिरोडा -वेंगुर्ला-बोरिवली बस फेरी सुरु

        वेंगुर्ला आगारातून शिरोडा-वेंगुर्ला-बोरिवली अशी बस फेरी सुरू करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले असून 15 एप्रिलपासून सदरील बस फेरी सुरू झाली आहे. शिरोडा येथून सायं.4.30 वा. तर वेंगुर्ला येथून सायं.5 वा. सोडण्यात येईल. परतीच्या प्रवासादरम्यान, बोरिवली येथून सायं.7 वा. सुटेल. यासाठी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष संदेश सावंत, वेंगुर्ला आगार अध्यक्ष बाळू देसाई, कार्याध्यक्ष पपू परब, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, सुदन कवठणकर, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे, सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ विभागीय सचिव भरत चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply