►शाळेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नाही!

कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेच्या इमारतीचे निर्लेखन संपूर्णत: कायदेशिररित्याच झाले आहे. पालिकेचा मालकी हक्क असलेली ही शाळा जीर्ण व धोकादायक झाली होती. पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे इमारत निर्लेखनाचा प्रस्ताव पाठविला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व बाबींची पडताळणी करूनच पुढील कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. तथापी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कर्तव्यात कसूर झाल्याने 6 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून संताप व्यक्त झाला. शाळेची इमारत चोरीला गेल्याचा उपरोधिक आरोप सभागृहात करण्यात आला होता. प्रत्यक्षा मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कोणताही हस्तक्षेप झाला नाही, असा खुलासा वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी केला आहे.

Leave a Reply