संपर्क अधिका-यांनी दिल्या आवास योजनेबाबत सूचना

वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत घरकुल बांधून उद्दिष्ट पूर्ण करणे, विविध शासकीय योजनेचा लाभ देऊन सर्व सुविधांनी युक्त घरकुल देणे, भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन देणे अशाप्रकारच्या सूचना महा आवास अभियान ग्रामीणचे…

0 Comments

श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन

वेंगुर्ला होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ व अॅड.दत्ता पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश कौलगेकर, सचिव सचिन वराडकर, खजिनदार सावळाराम भराडकर, प्राचार्य डॉ.के.जी.केळकर, उपप्राचार्या…

0 Comments

तालुका समितीतर्फे पत्रकार दिन

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पं.स.सभापती अनुश्री कांबळी, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा परब, पत्रकार समितीचे अध्यक्ष के.जी.गावडे, उपाध्यक्ष प्रदिप सावंत, सचिव दाजी नाईक, सदस्य मॅक्सि कार्डोज, आपा परब, एस.एस.धुरी, विनायक वारंग, अजय गडेकर, प्रथमेश गुरव,…

0 Comments

७६ पथविक्रेत्यांना धनादेशाचे वितरण

कोरोनाच्या काळात व्यवसाय बंदीचा फटका पथविक्रेत्यांनाही बसला आहे. यातून त्यांना सावरण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वनिधीतून पथविक्रेत्यांना कर्जाऊ रक्कमेचे धनादेश देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. या योजनेंतर्गत वेंगुर्ला शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून स्थिर-अस्थिर आणि तात्पुरत्या स्वरुपाचा व्यवसाय करणा-या सुमारे…

0 Comments

वेंगुर्ला बंदर येथे कंटेनर टॉयलेटची व्यवस्था

वेंगुर्ला बंदरवर टॉयलेटची सोय नसल्याने इथे येणा-यांमधून नाराजीचे सूर उमटत होते. याठिकाणची जागा ही मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने येथे कायमस्वरुपी टॉयलेट उभारणे नगरपरिषदेला शक्य नव्हते. दरम्यान, वेंगुर्ला नगरपरिषदेने याकडे प्राधान्याने लक्ष देऊन स्त्रीया आणि पुरुषांसाठी वेगवेगळी कंटेनर टॉयलेटची व्यवस्था केली आहे. याचे…

0 Comments

दंड ठोठावणे म्हणजे कामात निरुत्साह निर्माण करणे – नगराध्यक्ष गिरप

वेंगुर्ला नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन २०१६ मधील नियमांची पूर्तता केलेली असतानाही शासनाकडून पूर्तता न करणा-या नगरपरिषदांच्या यादीतून नाव कमी करण्याची कार्यवाही झाली नाही. सदर यादीत वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव विनाकारण घालण्यात आले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या स्वच्छ प्रतिमेस डाग लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप…

0 Comments

तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीसाठी एकूण ५५ अर्ज दाखल

वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली अशा दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३० डिसेंबर रोजी सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी एकूण २२ तर आरवली ग्रामपंचायतीसाठी एकूण ३३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती वेंगुर्ला नायब तहसिलदार संतोष बांदेकर यांनी दिली. आरवली निवडणूक…

0 Comments

२० अर्धगोलाकार शेड व २ हार्डनिंग शेडचे उद्घाटन

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत यांनी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी तंत्रज्ञान व माहिती प्रशिक्षण केंद्र नूतन इमारतीच्या कामाची पाहणी केली व सध्या सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी चांदा ते बांदा…

0 Comments

सलग तिस-या वर्षी स्थायी समिती नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यापुरतीच मर्यादित

वेंगुर्ला नगरपरिषदेतील दोन्ही विषय समिती सभापती पदे निवड यावर्षीही नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने रिक्त राहिली आहेत. त्यामुळे सलग तिस-या वर्षी वेंगुर्ला नगरपरिषदेची स्थायी समिती नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यापुरतीच मर्यादित राहिली आहे.       वेंगुर्ला नगरपरीषदेच्या विषय समिती सभापती निवडणूक प्रक्रियेस ३० डिसेंबर रोजी सकाळी…

0 Comments

ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

सिधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा वेंगुर्ल्याची सभा २६ डिसेंबर रोजी येथील साई मंगल डिलक्स हॉल येथे संपन्न झाली. या सभेत वेंगुर्ला शाखेने प्रथमच प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राजाराम चिपळूणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अरुण गोगटे, तालुका अध्यक्ष श्रीकांत रानडे, उपाध्यक्ष…

0 Comments