वेंगुर्ले तालुका स्कूलच्या विठाई सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न
आपल्याला घडविणारी शाळा आणि त्याशाळेचे ऋण फेडणाऱ्या व्यक्ती या मोजक्याच असतात. भला मोठा खर्च असताना आपल्या परिवारांच्या माध्यमातून निधी देत शाळेत दोन वर्ग खोल्या आणि सभागृहाचे काम करुन दिले आणि विद्यार्थ्यांची शाळेत शिक्षण घेतानाची अडचण दूर केली. हा शांताराम नाईक आणि कुटुंबियांचा मोठेपणा…
