संधीची मानगुट धरायची कोणी?
माडा-पोफळींच्या बागातून वाट शोधत जमिनीला भिडणारे सकाळची कोवळी उन्हं... आयन, किजळ, आंबा, काजू, फणस, जांभूळ, चाफा, पटकुळणींची रानं, नद्या, ओढ्यांच्या किना-याने गच्च भरलेली केगदींची रानं, खाड्यांच्या किना-यांवर पिढ्यान् पिढ्या वाढलेली खारफुटीची जंगलं, किना-यावरची मच्छिमारांची घरं, समुद्रात डौलात हेलकावणा-या होड्या, किना-यावरच्या वाळू उभ्या असणा-या…
