वादळानंतर…!
‘तौक्ते‘ नावाचे वादळ आले आणि गेले. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना त्याचा जोरदार फटका बसला. राज्यात १९ जणांचे बळी गेले. शेकडो घरे पडली. मच्छिमारांची प्रचंड हानी झाली. गेल्यावर्षी अशाच ‘निसर्ग‘ नावाच्या वादळाने कोकणची प्रचंड वाताहत केली होती. त्यातून अद्याप सावरले नसताना यंदा…
