विद्यार्थ्यांसमोर उलघडला नाट्यकलेचा गाभा
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या अभियाना अंतर्गत कलावलयतर्फे आयोजित केलेल्या नाट्य कार्यशाळेत ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक व कलावंत तुषार भद्रे यांनी विद्यार्थ्यांना नाट्यकलेचा गाभा समजावून सांगितला. नाटक केवळ एक कला प्रकार नाही, तर ते जीवनाचा आरसा आहे. नाटकामध्ये माणसाच्या भावनांचे, संघर्षांचे आणि व्यक्तिमत्वाचे…
