दिवाळी विशेष कार्यशाळेतून मुलांच्या कलागुणांना चालना
सुट्टीत मुलांच्या मोबाईलचे करायचे काय असा प्रश्न असणाऱ्या आम्हा पालकांसाठी ‘माझा वेंगुर्ला’ची कार्यशाळा नेहमीच दिलासादायक ठरते. ‘माझा वेंगुर्ला’चे वेगवेगळे उपक्रम मुलांच्या आणि आम्हा पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरतात, असे प्रतिपादन माझा वेंगुर्ल्याच्या किशोरवयीन मुलांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी विशेष कार्यशाळेत पालकांनी उत्स्फूर्तपणे मांडले. …
