लोकशाहीचा चौथा स्तंभ
वृत्तपत्रांचा आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा आहे. त्याकाळी जनमत बदलायचे व त्याचे चळवळीत रुपांतर करावयाचे काम वृत्तपत्रांनी चोख बजावले. कारण, तेव्हा विश्वासार्हता हे त्यांचे सगळ्यात मोठे भांडवल होते. खरे, खोटे करतांना पूर्वी ठामपणे सांगितले जायचे की, हे वृत्तपत्रात छापून आले आहे म्हणजे सत्यच…